Entries by श्रीअरविंद

श्रीमाताजी आणि समीपता – ३०

श्रीमाताजी आणि समीपता – ३० ‘क्ष’ हा साधक बहुधा पुढील दोन चुका करत आहे. तो श्रीमाताजींकडून प्रेमाच्या बाह्य अभिव्यक्तीची अपेक्षा करत आहे आणि दुसरी चूक म्हणजे, खुलेपणा आणि समर्पण यांवर निरपेक्षपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी तो प्रगती करण्याच्या मागे लागला आहे. साधक नेहमीच या दोन चुका करत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती ईश्वराप्रत खुली होते, उन्मुख होते, […]

श्रीमाताजी आणि समीपता – २८

श्रीमाताजी आणि समीपता – २८ ईश्वरी प्रभावाशिवाय अन्य कोणतेही प्रभाव (influences) स्वीकारायचे नाहीत, ही गोष्ट साध्य करून घेण्यासारखी आहे; कारण सहसा मानवी प्रकृती ईश्वरी प्रभाव न स्वीकारता इतरच प्रभाव स्वीकारत असते. श्रीमाताजींच्या दिव्य प्रकाशाच्या आणि दिव्य शक्तीच्या एकमेव प्रभावाखाली राहिल्याने, प्रकृतीमधील जे जे काही बदलणे आवश्यक असते ते, शांतपणे व सहजतेने बदलता येऊ शकते आणि […]

श्रीमाताजी आणि समीपता – २७

श्रीमाताजी आणि समीपता – २७ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) साधक : पूर्ण दिवसभर माझा प्राण आक्रंदन करत होता. श्रीमाताजी आपल्याबाबत निष्ठुर झाल्या आहेत असे त्याला वाटत होते आणि त्यांच्या प्रेमापासून तो वंचित झाला आहे असे वाटल्यामुळे, तो आकांत करत होता. त्यांच्या मौनामुळे तो कोलमडून पडतो, आणि त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तो कोमेजून जातो. श्रीअरविंद : […]

श्रीमाताजी आणि समीपता – २६

श्रीमाताजी आणि समीपता – २६ साधक : आज सकाळी ‘क्ष’च्या मार्फत मी श्रीमाताजींना पत्र पाठविले. परंतु मला त्यांच्याकडून अजूनपर्यंत उत्तर मिळाले नाही. माझ्या हातून काही चूक घडली का? त्यांचा एकेक शब्द ऐकण्यासाठी मी अगदी व्याकुळ झालो आहे. श्रीअरविंद : अशा प्रकारच्या भावनांना नेहमी नकारच दिला पाहिजे. ईश्वराबरोबर असलेले नाते, श्रीमाताजींबरोबर असलेले नाते हे प्रेमाचे, श्रद्धेचे, […]

श्रीमाताजी आणि समीपता – २५

श्रीमाताजी आणि समीपता – २५ साधक : माझ्या मनामध्ये श्रीमाताजींविषयी शुद्ध भक्तीचा उदय कसा होईल? श्रीअरविंद : विशुद्ध भक्ती, आराधना असणे आणि कोणताही दावा किंवा मागणी न बाळगता ईश्वराविषयी प्रेम असणे याला म्हणतात शुद्ध भक्ती. साधक : ती कोठून आविष्कृत होते? श्रीअरविंद : अंतरात्म्यामधून. * साधक : श्रीमाताजींविषयीची आंतरात्मिक भक्ती, मानसिक भक्ती आणि प्राणिक भक्ती […]

श्रीमाताजी आणि समीपता – २४

श्रीमाताजी आणि समीपता – २४ साधक : आज ‘बाल्कनी दर्शना’च्या वेळी संध्याकाळी जेव्हा मी श्रीमाताजींचे दर्शन घेत होतो तेव्हा मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा आलेला आढळला. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत माझी अन्य कोणतीच इच्छा नाही. अशी ‘अहैतुकी भक्ती’ मला लाभावी, असे आपण मला वरदान […]

श्रीमाताजी आणि समीपता – २३

श्रीमाताजी आणि समीपता – २३ साधक : गेली चार वर्षे माझा अंतरात्मा नेहमीच सक्रिय आणि अग्रभागी होता, हे माझे म्हणणे योग्य आहे का? माझ्या प्रकृतिगत घटकांना धक्का न लावता, म्हणजे त्यासंबंधी कोणताही विचार करण्याची आवश्यकता न पडता, आता श्रीमाताजी माझ्यावर कार्य करू शकतात का? श्रीअरविंद : तुमचा अंतरात्मा अग्रभागी आलेला असेल आणि सक्रिय असेल म्हणजेच […]

श्रीमाताजी आणि समीपता – २२

श्रीमाताजी आणि समीपता – २२ साधक : माझी चेतना ही फक्त श्रीमाताजींच्या हृदयावर स्थिरावलेली आहे, जणू काही ती चेतना त्यांच्यामध्येच वसत असावी आणि त्यांच्याशी एकात्म पावलेली असावी. ती केवळ श्रीमाताजींशी एकत्व पावण्याचाच विचार करत असते, ती म्हणते, “मी त्यांच्यामध्ये वसत आहे, आणि माझी वसती तेथेच असली पाहिजे. मला एवढेच पुरेसे आहे, मला त्याव्यतिरिक्त अन्य काहीच […]

श्रीमाताजी आणि समीपता – २१

श्रीमाताजी आणि समीपता – २१ साधक : मला नेहमीच असे आढळून आले आहे की, जेव्हा जेव्हा दिव्यत्वाबद्दल एक प्रकारचे आंतरिक प्रेम उफाळून वर येते तेव्हा डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागतात. श्रीअरविंद : ते भक्तीचे आंतरात्मिक (psychic) अश्रू असतात. * साधक : (थोडे दिवसांसाठी आश्रमात वास्तव्यास आलेल्या) एक साधिका आज आश्रमातून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. जेव्हा श्रीमाताजींच्या […]

श्रीमाताजी आणि समीपता – २०

श्रीमाताजी आणि समीपता – २० साधक : सकाळपासून मला असे जाणवते आहे की, मी श्रीमाताजींच्या सन्निध आहे, जणू काही आम्हा दोघांमध्ये काही द्वैतभावच शिल्लक राहिलेला नाहीये. पण हे कसे शक्य आहे? कारण त्यांच्या आणि माझ्यामध्ये केवढी मोठी दरी आहे? मी मानसिक स्तरावर आहे आणि त्या तर अत्युच्च अतिमानसिक (Supramental) स्तरावर आहेत. श्रीअरविंद : श्रीमाताजी या […]