Entries by श्रीअरविंद

,

तंत्रमार्ग

प्रथम आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो की, भारतात आजही एक विलक्षण योगपद्धती अस्तित्वात आहे. ही पद्धती स्वभावत: समन्वयात्मक आहे. तथापि ही योगपद्धती एक स्वतंत्र योगच आहे; ती इतर योगपद्धतींचा काही समन्वय नाही. ही विलक्षण योगपद्धती म्हणजे तंत्रपद्धती होय. तंत्रमार्गात काही घटना घडून आल्याने, जे तांत्रिक नाहीत त्यांना तंत्रमार्ग निंद्य वाटू लागला आहे. …तथापि तंत्रपद्धतीचे […]

,

कर्मयोग

प्रत्येक मानवी कर्म ईश्वराच्या इच्छेला समर्पित करावे हे साध्य कर्ममार्ग मानवाच्या समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आमच्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू आम्ही सर्वथा टाकून द्यावा, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म आम्ही करू नये, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म आम्ही करू नये या व्रतापासून होतो. या त्यागाच्या व्रताने कर्ममार्ग हा आमचे मन व आमची इच्छा शुद्ध करू शकतो; […]

,

पूर्णयोगाचा परम मार्गदर्शक

आमच्या हृदयांत गुप्त असलेला आंतरिक मार्गदर्शक, जगद्गुरू हा पूर्णयोगाचा श्रेष्ठ मार्गदर्शक आणि गुरु आहे. हा आंतरिक जगद्गुरू आपल्या ज्ञानाच्या तेजस्वी प्रकाशाने आमचा अंधकार नाहीसा करतो; हा प्रकाश आमच्या ठिकाणी, या आंतरिक जगद्गुरूच्या वाढत्या वैभवाच्या आत्माविष्काराचे रूप घेतो. हा गुरु आमच्या ठिकाणी क्रमाक्रमाने त्याचे स्वाभाविक स्वातंत्र्य, आनंद, प्रेम, सामर्थ्य आणि अमृतत्व अधिकाधिक प्रमाणात व्यक्त करतो. तो […]

,

भक्तियोग

भक्तिमार्ग हा परम प्रेम व परम आनंद यांच्या भोगाला आपले साध्य मानतो. ईश्वर हा व्यक्तिरूपात विश्वाचा दिव्य प्रेमी व भोक्ता आहे, या कल्पनेचा उपयोग सामान्यतः भक्तियोगात करण्यात येतो. भक्तियोगामध्ये जग म्हणजे ईश्वराची लीला आहे या भूमिकेतून पाहिले जाते; आत्मविलोपन व आत्मप्रकटीकरण यांच्या निरनिराळ्या अवस्थांमधून जात जात, त्या लीलेच्या शेवटच्या अंकामध्ये, जीवाचा मानवी जीवनात प्रवेश होतो. […]

,

ज्ञानयोग

ज्ञानमार्ग हा, परमश्रेष्ठ एकमेवाद्वितीय असणाऱ्या आत्म्याचा साक्षात्कार हे आपले साध्य मानतो. साधक या मार्गात बुद्धीचा उपयोग करून ‘विचारा’च्या द्वारा ‘विवेका’कडे, वाटचाल करतो, सारासारविवेकाकडे वाटचाल करतो. ज्ञानमार्ग आमच्या नामरूपात्मक प्रकट अस्तित्वाचे वेगवेगळे घटक बारकाईने पाहून अलग करतो. ज्ञानमार्गी साधक या घटकांपैकी प्रत्येक घटक घेऊन, अमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, तमुक एक घटक म्हणजे आत्मा नव्हे, […]

,

राजयोग

राजयोगात सर्वप्रथम जी क्रिया हाती घेण्यात येते ती अवधानपूर्वक, काळजीपूर्वक आत्मशासन करण्याची क्रिया होय. या आत्मशासनामध्ये, निम्न पातळीवरील नाडी-पुरुषाच्या बेबंद क्रियांची जागा मनाच्या चांगल्या सवयींनी घेतली जाते. सत्याचा अभ्यास, अहंकारी धडपडीचे सर्व प्रकार टाकून देणे, दुसऱ्यांना इजा करण्याचे टाळणे, पावित्र्य, मानसिक राज्याचा खरा स्वामी जो दिव्य पुरुष त्याचे नित्य चिंतन, त्याचा नित्य ध्यास या गोष्टींनी […]

,

हठयोग

हठयोगाच्या मुख्य प्रक्रिया आसन व प्राणायाम या आहेत. हठयोगात अनेक आसने किंवा शरीराच्या निश्चल बैठका आहेत; या आसनांच्या द्वारा हठयोग प्रथम शरीराची चंचलता दूर करतो : शरीरात विश्वव्यापी प्राणशक्ती-सागरातून ज्या प्राणशक्ती ओतल्या जात असतात, त्या प्राणशक्ती, काहीतरी क्रिया व हालचाली करून निकालात न काढता, शरीरात राखून ठेवण्याची शरीराची असमर्थता या चंचलतेने व्यक्त होत असते; ही […]

,

सर्व जीवन हे योगच आहे

मुक्त व पूर्ण मानवी जीवनात, ईश्वर व प्रकृती यांचे पुन:एकत्व हे ज्याचे ध्येय असते; आणि आंतरिक व बाह्य कृती यांच्यात सुमेळ ही ज्याची पद्धत असते; तसेच त्या दोन्हींची परिपूर्ती दिव्यत्वात होते ही ज्याची अनुभूती असते; तोच योगसमन्वय उचित होय. कारण, भौतिक जगतात उतरलेल्या उच्चतर सत्तेचे, सद्वस्तूचे मानव हेच असे प्रतीक व निवासस्थान आहे की, तेथे […]

,

योगपद्धती आणि विज्ञान

योगपद्धती आणि मानवाच्या सवयीच्या मनोवैज्ञानिक क्रिया यांचा संबंध थोड्याबहुत प्रमाणात विज्ञान आणि निसर्ग यांच्या संबंधासारखा आहे : वाफ किंवा वीज या निसर्ग शक्तीचे स्वाभाविक सामान्य व्यापार आणि याच शक्तीचे विज्ञानघटित व्यापार याचा जो संबध तोच संबध थोड्याफार प्रमाणात मानवाच्या सवयीच्या सामान्य मनोवैज्ञानिक क्रिया आणि योगप्रक्रिया यांचा आहे. विज्ञानाच्या प्रक्रिया ज्याप्रमाणे नियमितपणे केलेले प्रयोग, वस्तुनिष्ठ विश्लेषण […]

,

योगसमन्वय

आमचा योगसमन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा आहे यापेक्षा, तो मनोमय देहाचा आत्मा आहे असे मानतो; त्यामुळे मानव मनाच्या पातळीवरही आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; मनोमय कोशातील मानसिक शक्तियुक्त आत्मा हा उच्च आध्यात्मिक शक्ती, उच्च आध्यात्मिक अस्तित्व प्रत्यक्ष आत्मसात करू शकतो आणि अशा रीतीने, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो आणि या उच्च आध्यात्मिक शक्तीचा […]