Entries by अभीप्सा मराठी मासिक

अरविंद घोष – २०

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (महाराष्ट्रातील योगगुरूंशी आपली भेट कशी झाली हे अरविंद घोष येथे सांगत आहेत…) मी सुरत काँग्रेसची परिषद आटोपून जेव्हा बडोद्याला आलो तेव्हा, बारीन्द्रने मला लिहिले की बडोद्यात तो माझी त्याला माहीत असलेल्या एका योग्यांशी गाठ घालून देईल. बारीन्द्रने बडोद्याहून श्री. लेले यांना तार केली आणि ते आले. तेव्हा मी श्री. […]

अरविंद घोष – १९

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ अरविंद घोष यांना काही आध्यात्मिक अनुभव आलेले होते, पण योग म्हणजे काय? किंवा त्यासंबंधी काहीही माहीत नसताना आलेले ते अनुभव होते. उदाहरणार्थ, दीर्घ काळानंतर परत भारताच्या भूमीवर, मुंबई येथील अपोलो बंदरावर पहिले पाऊल ठेवताना आलेला शांतीच्या अवतरणाचा अनुभव; श्री शंकराचार्यांच्या टेकडीवरून (तख्त-ए-सुलेमानच्या पर्वतरांगेवरून) फिरत असताना त्यांना झालेला शून्य अनंताचा […]

अरविंद घोष – १८

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ इ. स. १९०७ मध्ये राजद्रोहाचे संशयित म्हणून अरविंद घोष यांच्यावर कारवाई करण्यात आली पण पुढे त्यांची निर्दोष सुटकादेखील झाली. आत्तापर्यंत ते केवळ एक संघटक किंवा लेखक म्हणूनच राहिले होते, परंतु या घटनेमुळे म्हणा किंवा त्यांच्या तुरुंगवासामुळे म्हणा वा इतर नेते लुप्त झाल्यामुळे म्हणा, अरविंदांना बंगालमधील पक्षाचे अधिकृत प्रमुख म्हणून […]

अरविंद घोष – १७

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ब्रिटिश शासनाची अरविंद घोष यांच्यावर कायमच वक्र दृष्टी राहिली. त्यांच्याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये ‘भारतातील सर्वात भयानक माणूस म्हणजे अरविंद घोष’ अशी चर्चा असे. ‘वंदे मातरम्’ ह्या वृत्तपत्राच्या लेखनामध्ये अरविंदांचा हात आहे असा ब्रिटिश सरकारला संशय होता आणि त्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकार अगदी उत्सुक होते. अरविंदांच्या नावाने […]

अरविंद घोष – १५

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ अरविंद घोष यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने इ. स. १९०२ ते इ. स. १९१० या कालावधीत सामावलेली आहे. मवाळ सुधारणावाद हा त्याकाळातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा धर्म होता पण त्यापेक्षाही अधिक थेटपणे भिडून, राजकीय चळवळ लोकांमध्ये पुढे नेण्यासाठीची एक संधी बंगालमधील जनक्षोभामुळे त्यांना मिळाली. परंतु तोपर्यंत सुरुवातीचा जवळपास निम्मा कालावधी ते […]

अरविंद घोष – १४

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ बिपिनचंद्र पाल हे त्याकाळी त्यांच्या ‘न्यू इंडिया’ या साप्ताहिकामधून स्वयंसाहाय्यता आणि असहकार धोरणाचा प्रचार प्रसार करत असत, त्यांनी आता ‘वंदे मातरम्’ नावाचे दैनिक काढले, पण अर्थातच हे साहस अल्पकालीनच ठरणार होते कारण स्वत:च्या खिशातल्या ५०० रू. च्या आधारे त्यांनी हे साहस आरंभले होते आणि भविष्यामध्येही आर्थिक साहाय्य मिळण्याची कोणतीही […]

अरविंद घोष – १३

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ बडोदा संस्थानामध्ये असलेल्या अरविंद घोष यांच्या विशेष हुद्द्यामुळे त्यांना जाहीररित्या कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणे शक्य नव्हते त्यामुळे, शेवटचा काही काळ ते सुट्टीवर राहून, पडद्याआडून राजकीय हालचालींमध्ये सक्रिय राहिले. इ. स. १९०५ साली मात्र वंगभंगामुळे उसळलेल्या जनक्षोभ आंदोलनामुळे त्यांना बडोदा येथील सेवेतून मुक्त होण्याची संधी मिळाली आणि तेव्हा […]

अरविंद घोष – १२

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (अरविंद घोष यांनी पत्नी मृणालिनीदेवी यांना लिहिलेले पत्र – दि. ३० ऑगस्ट १९०५) वेडेपणाच्या वाटतील अशा तीन गोष्टी माझ्या मनात आहेत. त्यापैकी पहिले वेड म्हणजे, माझा असा दृढ विश्वास आहे की जे गुण, जी प्रतिभा, जे उच्च शिक्षण, जी विद्या व जे धन देवाने मला दिले आहे, ते सगळे […]

अरविंद घोष – ११

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (बडोद्यात राहत असताना आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी व त्यांनी केलेल्या साधनेविषयी उत्तरायुष्यात एके ठिकाणी श्रीअरविंद सांगत आहेत…) मी बडोद्यात राहत असताना, दिवसभरात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी दोन तास असा साधारणपणे पाच तास प्राणायामाचा अभ्यास करीत असे. माझे मन महान अशा प्रकाश आणि शक्तीने कार्य करू लागले आहे असे […]

अरविंद घोष – १०

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ इ. स. १९०३ मध्ये कामाचा भाग म्हणून अरविंद घोष बडोदानरेश सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. तेव्हा श्री शंकराचार्य मंदिराच्या टेकडीवर अरविंदांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. त्यांचा तो अनुभव पुढे कवितारूपाने अभिव्यक्त झाला. तो असा – जिथे शंकराचार्यांचे छोटेसे मंदिर उभे आहे त्या, तख्त-ए-सुलेमानच्या राजमार्गावरून मी चालत होतो. पृथ्वीचा […]