Entries by अभीप्सा मराठी मासिक

अरविंद घोष – ३१

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ दिनांक २९ मार्च १९१४. सकाळच्या वेळी अरविंदांना पॉल रिचर्ड्स भेटून आले होते. मीरा अरविंदांना दुपारी भेटणार होत्या. वातावरणात एक कुंद गभीरता होती, उत्सुकता होती. हा पुढील सर्व भाग त्यांच्याच शब्दांत जाणून घेणे श्रेयस्कर आहे. “मी काही पायऱ्या चढून वर गेले तर पायऱ्या जिथे संपत होत्या तेथे, सर्वात वर ते […]

अरविंद घोष – ३०

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ मि. पॉल व मीरा रिचर्ड्स (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) यांच्याबरोबर अरविंद घोष यांचा पत्रव्यवहार होत राहिला. त्याबद्दल अरविंद यांनी म्हटले आहे की, “युरोपमधील दुर्मिळ योग्यांमध्ये पॉल व मीरा रिचर्ड्स यांची गणना होते, माझा त्यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरील पत्रव्यवहार चालू आहे.” अरविंदांनी आपल्या निकटवर्तियांना, (जे त्यांच्याबरोबर देशासाठी क्रांतिकार्यात […]

अरविंद घोष – २९

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ अरविंद घोष पाँडिचेरीला गेल्यानंतर चार वर्षे पूर्णपणे योगसाधनेमध्ये निमग्न होते. ते म्हणतात – ”मला ईश्वरी साहाय्य सातत्याने उपलब्ध होते, तरी खरा मार्ग सापडण्यासाठी मला चार वर्षे आंतरिक धडपड करावी लागली, आणि त्यानंतर सुद्धा मला तो मार्ग योगायोगानेच सापडला असे म्हणावे लागेल. आणि पुढेही खरा मार्ग सापडण्यासाठी त्या परमोच्च आंतरिक […]

अरविंद घोष – २८

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ ईश्वरी आदेशानुसार श्री. अरविंद घोष चंद्रनगर येथे पोहोचले होते. एक-दीड महिन्याच्या वास्तव्यानंतर, तशाच आणखी एका ‘आदेशा’नुसार, त्यांनी चंद्रनगर सोडले आणि S.S. Dupleix नावाच्या जहाजाने दि. ०१ एप्रिल रोजी ते द्वितीय श्रेणीमधून प्रवासास निघाले. ब्रिटिशांना त्यांच्या प्रयाणाचा सुगावा लागू नये, म्हणून त्यांचे वेगळ्याच नावाने तिकीट काढण्यात आले होते. प्रवासासाठी खासगी […]

अरविंद घोष – २६

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (चंद्रनगरला केलेल्या प्रस्थानाची अरविंद घोष यांनी स्वत: सांगितलेली हकिकत…) पोलिस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मला अशी माहिती मिळाली की, दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयावर छापा घातला जाणार आहे आणि मला अटक करण्यात येणार आहे; ही माहिती मिळाली तेव्हा मी ‘कर्मयोगिन’च्या कार्यालयात होतो. (नंतर खरोखरच कार्यालयावर छापा घालण्यात आला पण माझ्याविरुद्ध […]

अरविंद घोष – २५

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ श्री. अरविंद घोष यांची अलीपूरच्या कारावासातून सुटका झाली तो दिवस होता दि. ६ मे १९०९. आणि लगेचच म्हणजे दि. १९ जून रोजी त्यांनी ‘कर्मयोगिन्’ हे साप्ताहिक सुरु केले. राष्ट्रीय धर्म, साहित्य, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यावर भाष्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे साप्ताहिक सुरु केले होते. त्यामागची भूमिका त्यांच्याच शब्दांत जाणून […]

अरविंद घोष – २४

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ कैदी म्हणून अलिपूर तुरुंगातील एका वर्षाच्या कारावासानंतर इ. स. १९०९ च्या मे महिन्यामध्ये जेव्हा अरविंद घोष निर्दोष सुटून बाहेर आले तेव्हा त्यांना आढळले की, संघटना विखुरली आहे; तिचे पुढारी तुरुंगावासामुळे, हद्दपार केल्यामुळे किंवा स्वत:हून अज्ञातवासात गेल्यामुळे विखुरले गेले आहेत तरीही पक्ष अजून तग धरून आहे पण तोदेखील मूक व […]

अरविंद घोष – २३

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (अलीपूर बॉम्बकेस मधून अरविंद घोष यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, त्यानंतर कलकत्त्यामधील उत्तरपारा येथे, धर्मरक्षिणी सभेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दि ३० मे १९०९ रोजी श्रीअरविंद यांनी जे भाषण केले, ते ‘उत्तरपाराचे भाषण’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्या भाषणात ते आपल्या कारावासातील दिवसांविषयी सांगत आहेत…) ”मी सुटून येणार हे मला माहीत […]

अरविंद घोष – २२

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ अलिपूरच्या कारावासात असताना अरविंद घोष यांनी ‘गीता’प्रणीत योगमार्गाची साधना केली आणि उपनिषदांच्या साहाय्याने ध्यान केले. केवळ याच ग्रंथांमधून त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांना कोणता एखादा प्रश्न पडला वा अडचण भेडसावली तर ते गीतेकडे वळत असत आणि बहुतेक वेळा त्यांना त्यातून उत्तर वा साहाय्य मिळत असे. कारावासामध्ये असताना, एकांतात त्यांची जी […]

अरविंद घोष – २१

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’ (शांत ब्रह्माची अनुभूती आल्यानंतर, अरविंद घोष यांना अल्पावधीतच आणखी एका अनुभव आला. त्याविषयी ते सांगत आहेत…) मी मुंबईमध्ये असताना, मित्राच्या घराच्या बाल्कनीमधून मी तेथील व्यग्र जीवनाच्या हालचाली पाहत होतो, त्या मला चित्रपटातील चित्राप्रमाणे आभासी, छायावत् वाटत होत्या. हा वेदान्ती अनुभव होता. अगदी अडीअडचणींमध्ये असतानासुद्धा कधीच गमावू न देता, मी […]