Entries by अभीप्सा मराठी मासिक

नैराश्यापासून सुटका – ०१

नैराश्यापासून सुटका – ०१ जीवन विविधरंगी असते. कधी चैत्रपालवी तर कधी वैशाख-वणवा, कधी नयनरम्य तर कधी ओसाडरुक्ष दृश्य, कधी मोरपंखी कोमलता तर कधी पाषाणाची कठोरता; अशा बहुरंगी, बहुढंगी चढ-उतारावरून, खाच-खळग्यातून जीवनप्रवाह खळाळता राहतो. मानवी जीवनही आशा-निराशेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते. कधी तप्त वाळूवर अनवाणी पावलांनी चालण्याचा अनुभव येतो तर कधी दवबिंदू-भिजल्या कोवळ्या गवतावर फेरफटका मारण्याचा स्पर्श-सुखद […]

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१

जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ एका साधकाने श्रीमाताजींच्या सान्निध्यात काम करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने ‘मला काही संदेश द्यावा,’ अशी विनंती त्यांना केली. तेव्हा श्रीमाताजींनी त्याला असा संदेश दिला की, “साधेसरळ असा, आनंदी राहा, अविचल राहा, शक्य तितक्या उत्तम रीतीने कर्म करा, माझ्याप्रति खुले, उन्मुख राहा, तुमच्याकडून एवढेच अपेक्षित आहे.” ‘जीवन जगण्याचे शास्त्र’ ही आपली […]

आत्मसाक्षात्कार – ०१

आत्मसाक्षात्कार – ०१ ‘अध्यात्म’ हा शब्द उच्चारला की त्याला जोडूनच साधना, अनुभव, अनुभूती, साक्षात्कार इत्यादी शब्द येतात. हे शब्द उपयोजिले जातात खरे, पण बरेचदा त्या शब्दांचा गर्भितार्थ काय, त्याची खोली किती आहे याची आपल्याला क्वचितच जाण असते. ‘आत्मसाक्षात्कार’ हादेखील असाच एक शब्द आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, काय केले असता आत्मसाक्षात्कार होऊ […]

भारताचे पुनरुत्थान – ०५

भारताचे पुनरुत्थान – ०५ वंदे मातरम् हा मंत्र जन-मानसात दुमदुमू लागला होता. नव्हे, आता हा मंत्र म्हणजे स्वातंत्र्याकांक्षी देशभक्तांच्या अस्मितेचा मानबिंदू ठरला होता. त्याच सुमारास ‘बंदे मातरम्’ या नियतकालिकाचा क्षितिजावर उदय झाला आणि त्यामध्ये प्रकाशित होणाऱ्या प्राध्यापक श्री. अरविंद घोष यांच्या जहाल लेखनामुळे, वंदे मातरम् हा मंत्रोच्चार भारतीयांच्या हृदयातील मातृभूमीच्या प्रेमाला आवाहन करणारा ठरला. ‘बंदे […]

भारताचे पुनरुत्थान – ०१

भारताचे पुनरुत्थान – ०१ नमस्कार वाचकहो, जग एका नव्या भारताचा उदय होताना पाहत आहे. हा उदय केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे तर अखिल पृथ्वीच्या आणि मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु भारताला त्याचे नियत कार्य करता यावे यासाठी भारताने प्रथम स्वतःचा पुनर्शेाध घेतला पाहिजे. भारताने स्वतःच्या भव्योदात्त आत्म्यामध्ये खोलवर बुडी घेतली पाहिजे आणि स्वतःच्या अक्षय ज्ञानस्रोतामधून पुन्हा […]

श्रीमाताजी आणि समीपता – ११

श्रीमाताजी आणि समीपता – ११ साधक : मी माझ्या खोलीत एकटा होतो तेव्हा खूप खुश होतो, तेव्हा मला श्रीमाताजींच्या चेतनेची आंतरिक जाणीव होती. जेव्हा मी ‘क्ष’ला भेटायला बाहेर गेलो तेव्हा मात्र श्रीमाताजींसोबत असलेला माझा आंतरिक संपर्क तुटला आणि मला लगेचच अस्वस्थ वाटू लागले. लोकांमध्ये मिसळल्याने (श्रीमाताजींच्या सन्निध असल्याची) माझी ही आंतरिक जाणीव नष्ट होते, पण […]

श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध

श्रीअरविंद आणि मराठी माणसांचा अनुबंध : जन्माने बंगाली असलेल्या श्रीअरविंद यांचे मराठी समुदायाशी, मराठी व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यांचे मराठीशी, महाराष्ट्राशी असलेले हे नाते अल्पज्ञात आहे. तेव्हा त्यांचा महाराष्ट्राशी असलेला अनुबंध थोडक्यात समजावून घेऊ. श्रीअरविंद आणि महाराजा सयाजीराव गायकवाड : अरविंद घोष हे शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये असताना त्यांचा तेथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी परिचय झाला. आणि […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०४

श्रीमाताजी आणि समीपता – ०४ (श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…) ‘आई आणि मूल’ यांच्यातील ‘प्रेम’ याचा अर्थ फक्त आईनेच मुलावर प्रेम केले पाहिजे असा होत नाही तर, मुलानेसुद्धा आईवर प्रेम केले पाहिजे आणि तिची आज्ञा पाळली पाहिजे असा होतो. तुम्हाला ‘श्रीमाताजीं’चे खरे बालक व्हायचे आहे, पण त्यासाठी प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे तर ती म्हणजे, तुम्ही […]

श्रीमाताजी आणि समीपता – ०१

श्रीमाताजी आणि समीपता – ०१ नमस्कार, कालपर्यंत आपण ‘पूर्णयोगांतर्गत ध्यान’ या मालिकेद्वारे श्रीमाताजींनी प्रतिपादित केलेल्या काही ध्यानपद्धती विचारात घेतल्या. पूर्णयोगाचा गाभा म्हणजे ईश्वरी शक्तीप्रत, श्रीमाताजींप्रत खुले होणे हा आहे, असे श्रीअरविंद यांनी वेळोवेळी सांगितले आहे. बरेचदा असे होते की, आपल्यामधील एक भाग, (अंतरात्मा) श्रीमाताजी या ‘ईश्वरी शक्ती’ आहेत असे मान्य करण्यास तयार असतो, परंतु केवळ […]

साधना, योग आणि रूपांतरण – २८४

साधना, योग आणि रूपांतरण – २८४ अवचेतन व अचेतन यांचे रूपांतरण नमस्कार वाचकहो, ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण आजवर साधना या विभागांतर्गत ध्यान, कर्म व भक्ती यांचा विचार केला. योग या विभागांतर्गत प्रामुख्याने ‘पूर्णयोग’ व त्याची वैशिष्ट्ये जाणून घेतली. रूपांतरण (transformation) या विभागामध्ये आपण आंतरात्मिक (psychic), आध्यात्मिक (spiritual) व अतिमानसिक (supramental) रूपांतरण याचा […]