(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी भारताविषयी आणि त्याच्या जीवितकार्याविषयी वेळोवेळी जे उद्गार काढले होते ते आता आजपासून रोज कालानुक्रमे देणार आहोत. तसा विचार करताना त्यातून एक विशिष्ट संगती प्रतीत होईल आणि आजच्या कालमानपरिस्थितीकडे पाहण्याचे एक नवीन भानही वाचकांना प्राप्त होईल, असा विश्वास वाटतो. )
लेखन – १९०७-१९०८
राष्ट्र म्हणजे काय?
आपण पाश्चात्त्य पद्धतीच्या शाळांमध्ये शिकतो आणि परिणामत: स्वत:च्या सखोल संकल्पना, सत्यतर वाणी विसरून आम्ही पाश्चात्त्यांची भाषा, त्यांचे विचार यांचे अंधानुकरण करण्यास शिकतो. पाश्चात्त्यांच्या लेखी, राष्ट्र म्हणजे असा देश की जेथे, अमुक एवढ्या जमिनीच्या तुकड्यावर वास्तव्य करणारी काही लाख माणसं एकच भाषा बोलतात, त्यांनी निवडलेल्या एकाच नियामक सत्तेशी एकनिष्ठ राहून, ती एकसारखेच राजकीय जीवन जगत राहतात. …परंतु, भारताची राष्ट्रीयतेची कल्पना मात्र अधिक सत्य आणि अधिक सघन असली पाहिजे.
आपल्या पूर्वजांनी तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तेव्हा त्यांना वस्तुमात्रांचा एक स्थूल देह दिसला, तसेच त्याच्या आत असणाऱ्या दुसऱ्या एका देहाचा म्हणजे सूक्ष्म देहाचा शोध त्यांना लागला. त्याच्याही पलीकडे गेल्यावर, त्यांना अधिक खोलवर दडलेल्या तिसऱ्या देहाचा शोध लागला. त्या तिसऱ्या देहाच्या आतमध्ये, जीवनाचा आणि रूपाचा उगमस्रोत सदासाठी, अचल व अविनाशी अशा स्वरूपात स्थित आहे असे त्यांना आढळून आले. जे व्यक्तीबद्दल सत्य आहे तीच गोष्ट सामान्यत: आणि वैश्विक स्तरावर देखील सत्य आहे. जे माणसाबाबत सत्य आहे अगदी तेच राष्ट्राबाबतही सत्य आहे.
देश, जमीन हा राष्ट्राचा केवळ बाह्यवर्ती देह, अन्नमय कोश असतो किंवा त्याला स्थूल शारीरिक देह असे म्हणता येईल. माणसांच्या समुहांमुळे, समाजामुळे, लाखो लोकांमुळे राष्ट्राचा हा देह व्यापलेला असतो आणि ते सारे केवळ त्यांच्या अस्तित्वांद्वारेच या देहामध्ये प्राणाची फुंकर घालतात, तो हा प्राणमय कोश, म्हणजे राष्ट्राचा प्राणदेह होय. हे दोन्ही देह स्थूल आहेत, (राष्ट्र)मातेचे ते भौतिक आविष्करण असते. स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो. विचार, साहित्य, तत्त्वज्ञान, मानसिक आणि भावनिक क्रियाकलाप, आशा, सुख, आकांक्षा, पूर्तता, सभ्यता आणि संस्कृती या साऱ्या साऱ्यांमधून राष्ट्राचे सूक्ष्म शरीर आकाराला येते. मातेच्या बाह्यवर्ती अस्तित्वाप्रमाणे असणारा हा भागही माणसाच्या भौतिक दृष्टीला दिसू शकतो.
राष्ट्राचा सूक्ष्म देह हा राष्ट्राच्या ‘कारण शरीरा’मध्ये (causal body) जे खोलवर दडलेले अस्तित्व असते त्यामधून उदयाला येतो. युगानुयुगे घेतलेल्या अनुभवांमधून जी विशिष्ट अशी मानसिकता तयार झालेली असते, ती त्या राष्ट्राला इतरांपासून वैशिष्ट्यपूर्ण बनवते. मातेचे हे तीन देह आहेत. परंतु त्या तिन्हीच्याही पलीकडे तिच्या जीवनाचा एक उगमस्त्रोत आहे, जो अमर्त्य, अचल आहे; प्रत्येक राष्ट्र हे त्याचे केवळ आविष्करण असते, त्या वैश्विक नारायणाचे, अनेकांमध्ये वास करणाऱ्या ‘एका’चे ते आविष्करण असते, ज्याची आपण सर्व जण बालकं आहोत.
– श्रीअरविंद (CWSA 06-07 : 1115-1116)
दि. १९.०६.१९०९ प्रत्येक व्यक्तीला, विशेषत: भारताचे, जगाचे, ईश्वराचे कार्य करण्यास पुढे सरसावणाऱ्या तरुण पिढीला…
(श्रीमाताजींनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतमातेला केलेले अभिवादन...) हे आमच्या माते, हे भारताच्या आत्मदेवते,…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…
(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…