ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भारताचे आध्यात्मिक योगदान

 

(भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला पुढील संदेश तिरूचिरापल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’ वरून प्रसारित करण्यात आला. त्या भाषणातील हा चौथा आणि अंतिम भाग…)

भारताचे जे आध्यात्मिक योगदान आहे ते या जगाला प्रदान करण्यास त्याने केव्हाच प्रारंभ केला आहे. भारताची आध्यात्मिकता सतत चढत्यावाढत्या प्रमाणात युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रवेश करत आहे. ही चळवळ वाढतच राहील. काळाच्या आपत्तींमध्ये भारताकडे जगाचे अधिकाधिक डोळे मोठ्या आशेने वळत आहेत. केवळ भारताच्या शिकवणुकीचाच नव्हे तर भारताच्या अंतरात्मिक आणि आध्यात्मिक साधनापद्धतींचाही (psychic and spiritual practice) ते उत्तरोत्तर अधिकाधिक आश्रय घेत आहेत. उर्वरित जे काही आहे ती अजूनतरी वैयक्तिक आशा आहे आणि एक अशी संकल्पना, एक असे उद्दिष्ट आहे की, ज्याने भारतातील आणि पाश्चात्त्य देशांमधील प्रगत विचारी मनांचा ठाव घ्यायला सुरुवात केली आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रयत्न करू लागल्यावर, मार्गामध्ये ज्या अडचणी येतात त्यापेक्षा कितीतरी अधिक भीषण अडचणी या मार्गावर आहेत; परंतु अडचणी या त्यांवर मात करण्यासाठीच असतात आणि जर ईश्वरी इच्छा तेथे असेल तर अडचणींवर मात केली जाईलच. येथे देखील, जर अशा प्रकारचे विकसन होणारच असेल तर ते आत्म्याच्या विकसनातूनच आणि आंतरिक चेतनेतूनच उदयास आले पाहिजे, यांमध्ये भारत पुढाकार घेऊ शकतो. आणि त्याची व्याप्ती वैश्विकच असणार, त्याची मध्यवर्ती प्रक्रिया भारताचीच असू शकेल.

भारताच्या स्वातंत्र्यदिनी मी हा आशय आपणापुढे मांडू इच्छितो. या गोष्टी पूर्णत्वास जातील किंवा नाही, त्या किती प्रमाणात आणि किती त्वरेने पूर्णत्वास जातील, हे सर्व काही या नूतन आणि स्वतंत्र भारतावर अवलंबून आहे.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 476 – 477)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

भारताची एकात्मता का आवश्यक?

  (भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…

2 days ago

देशाची फाळणी आणि भारताचे भवितव्य

  (भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…

3 days ago

श्रीअरविंद याच्या दिव्य दृष्टीसमोरील पाच ध्येयं

  (भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशीच्या पूर्वसंध्येला म्हणजे दि. १४ ऑगस्ट १९४७ रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला…

4 days ago

भारताचे जीवितकार्य – प्रास्ताविक

  अखिल सृष्टीसाठी असलेल्या दिव्य योजनेमध्ये भारताला मध्यवर्ती भूमिका बजावावी लागणार आहे, हे श्रीअरविंद आणि…

5 days ago

अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण

(श्रीमाताजीकृत प्रार्थना) १० एप्रिल १९१४ अचानकपणे पडदा भेदला गेला आणि समोर विस्तीर्ण क्षितिज खुले झाले…

6 days ago

साधनेची दुसरी बाजू

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण गेले दोन दिवस…

7 days ago