विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य
(व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि त्यामुळे मी अमुक अमुक कोणीतरी आहे, अशी व्यक्तीची समजूत होते. हा विचार आपण काल समजावून घेतला. आज त्याचा उत्तरार्ध…)
परंतु विभक्ततेच्या वळणावळणाच्या मार्गावरून जाऊन, म्हणजेच विभक्ततेचे, विविधतेचे लाभ घेऊन, जर आपण सच्चिदानंद स्वरूपाशी ऐक्य पुनर्स्थापित केले तर, आपल्याला अधिक उच्च प्रतीचे ऐक्य साध्य होईल.
…जेव्हा सच्चिदानंद हे एकले एकच (absolute) होते, तेव्हा त्या एकत्वाची जाणीव होणार तरी कोणाला? ते एकत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून का होईना, तसे एकत्व नसलेली अशी कोणतीतरी प्रतिमा आपल्यापाशी पाहिजे, कशाचे तरी रूप आपल्यासमोर पाहिजे. आणि मला वाटते विश्वाच्या अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. कदाचित ईश्वरच स्वतःला जाणून घेऊ इच्छित होता, म्हणून त्याने स्वतःला स्वतःपासून विभक्त केले आणि त्याने स्वतःला न्याहाळले आणि आता, स्वतःच्या पूर्ण ज्ञानानिशी, तो स्वतःच्या अस्तित्वाची शक्यता स्वतःच उपभोगू इच्छित आहे. आणि ही गोष्ट अधिक स्वारस्यपूर्ण आहे.
– श्रीमाताजी (CWM 07 : 237)
- भारतमातेला केलेले अभिवादन - October 12, 2026
- अनंत व चिरंतन किरणांचे आविष्करण - October 6, 2026
- तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी - September 29, 2026






