गृहस्थाश्रम
(प्राचीन काळातील वर्णाश्रमव्यवस्थेतील ब्रह्मचर्याश्रमाचा विचार कालच्या भागात आपण केला. आज ‘गृहस्थाश्रम’ ही संकल्पना जाणून घेऊ.)
गृहस्थाश्रम
ब्रह्मचर्याश्रमामध्ये संपादन केलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरविण्याच्या दृष्टीने आर्य मनुष्य गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करत असे आणि त्याद्वारे त्याला मानवी जीवनाची (अर्थ, काम व धर्म ही) पहिली तीन उद्दिष्टे साध्य करणे शक्य होत असे. गृहस्थाश्रमामध्ये असताना त्याला त्याच्या स्वाभाविक अस्तित्वाची, त्याच्या आवडीनिवडींची, जीवनानंद घेण्याच्या इच्छेची पूर्ती करता येत असे; तो समाजऋण फेडत असे; समाजाच्या गरजा पुरवत असे आणि अशा रितीने स्वतःच्या जीवनातील सर्व जबाबदाऱ्यांची परिपूर्ती करून, तो जीवनाच्या अंतिम आणि सर्वाधिक महत्त्वाच्या प्रयोजनासाठी स्वतःची तयारी करत असे. (क्रमश:)
• श्रीअरविंद (CWSA 20 : 175)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- एक महान निर्णायक वळण - October 25, 2026
- आपल्या मोक्षाची पूर्वअट - October 24, 2026
- भारत-माता - October 23, 2026







