(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
आध्यात्मिक अनुभव यावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. त्यासाठी तुमची अजून तयारी झालेली नाही. आणि त्यामुळे योग्य अनुभव येण्याऐवजी अन्य काहीतरी भलतेच अनुभवास येईल. तुम्ही तुमचा प्राण शुद्ध आणि शांत केला पाहिजे म्हणजे मग या अशा प्रकारच्या गतिप्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत. झोपायचे नाही, जेवायचेच नाही असले काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा प्राण काहीतरी असामान्य गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. असे केल्यामुळे साधना वेगाने घडेल अशी त्याची कल्पना आहे. आणि तो काहीतरी उच्च दर्जाचे करत आहे असेही तुमच्या प्राणाला वाटत आहे. (तुम्ही असे वागता कामा नये कारण) पूर्णयोगासाठी विशुद्ध, साधासरळ, शांत आणि समतोल प्राण आवश्यक असतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 34)
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन...) तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना…
(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन...) तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी…
असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा…
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…