नैराश्यापासून सुटका – ३५
नैराश्यापासून सुटका – ३५
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
तुम्ही कायम प्रसन्न राहावे, असे आम्हाला अपेक्षित आहे. याचा अर्थ असा की, अंतरात्म्याच्या आनंदाला आता त्याचा स्वतःचा मार्ग सापडला आहे आणि कितीही अडचणी आल्या तरी तो आनंदच (आता तुम्हाला) मार्गप्रवण करेल आणि ध्येयाप्रत घेऊन जाईल, हे निश्चित. एखाद्या साधकामध्ये जेव्हा अशी प्रसन्नता सातत्याने आढळून येते, तेव्हा आम्हाला माहीत असते की, तो साधक त्याच्या अत्यंत कठीण अशा अडचणीमधून बाहेर पडला आहे आणि आता तो सुरक्षित मार्गावरून दृढतापूर्वक वाटचाल करू लागला आहे.
*
चेष्टामस्करी, थट्टा यामधील सुख हे प्राणिक (vital) स्वरूपाचे असते. ते असता कामा नये असे मी म्हणत नाहीये; पण त्यापेक्षाही एक अधिक गभीर अशी प्रसन्नता असते, एक आंतरिक ‘सुखहास्य’ असते आणि ते सुखहास्य ही प्रसन्नतेची आध्यात्मिक स्थिती असते.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 173, 174)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026





