श्रीमाताजी आणि समीपता – २४
श्रीमाताजी आणि समीपता – २४
साधक : आज ‘बाल्कनी दर्शना’च्या वेळी संध्याकाळी जेव्हा मी श्रीमाताजींचे दर्शन घेत होतो तेव्हा मला माझ्यामध्ये भक्तीचा एक उमाळा आलेला आढळला. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे मला वाटले. जोपर्यंत अशी भक्ती माझ्या हृदयामध्ये जिवंत आहे तोपर्यंत माझी अन्य कोणतीच इच्छा नाही. अशी ‘अहैतुकी भक्ती’ मला लाभावी, असे आपण मला वरदान द्यावे. श्रीरामकृष्ण परमहंस म्हणत असत की, भक्तीची इच्छा ही काही इच्छावासना म्हणता यायची नाही. म्हणून मला असा विश्वास वाटतो की, अशी इच्छा बाळगून मी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करत नाहीये, कारण भक्ती हा ‘दिव्यत्वा’चा गाभा आहे, त्यामुळे माझे मागणे रास्त आहे ना?
श्रीअरविंद : ईश्वराबद्दलची इच्छा किंवा ईश्वराविषयी भक्ती ही अशी एक इच्छा असते की, जी व्यक्तीला अन्य सर्व इच्छांपासून मुक्त करते; (आपल्याला असे आढळते की,) त्याच्या गाभ्याशी ‘इच्छा’ नसते, तर ‘अभीप्सा’ असते. ती आत्म्याची निकड असते, आपल्या अंतरात्म्याच्या अस्तित्वाचा ती श्वास असते आणि असे असल्यामुळेच तिची गणना इच्छावासनांमध्ये केली जात नाही.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 476-477)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५ - January 27, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७५ - January 12, 2026
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ७४ - January 11, 2026





