साधना, योग आणि रूपांतरण – २०८

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा अग्रस्थानी येतो तेव्हा सारे काही आनंदमय होऊन जाते. वस्तुमात्रांकडे पाहण्याची योग्य दृष्टी, योग्य दृष्टिकोन प्राप्त होतो. अर्थात एक प्रकारे, हा चैत्य पुरुष म्हणजे तोच ‘स्व’ असतो की, जो त्याचे विविध घटक (मन, प्राण, शरीर) अग्रभागी ठेवत असतो. परंतु जेव्हा हे विविध घटक चैत्य पुरुषाच्या नियंत्रणाखाली येतात आणि ते चैत्य पुरुषाद्वारे उच्चतर चेतना ग्रहण करण्यासाठी तिच्या दिशेने वळविले जातात, तेव्हा सर्व घटकांमध्ये सुसंवाद निर्माण व्हायला सुरुवात होते. उच्चतर चेतनेच्या साच्यांमध्ये त्यांची क्रमाक्रमाने पुनर्रचना व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे ते घटक शांती, प्रकाश, शक्ती, प्रेम, ज्ञान आणि आनंदामध्ये वृद्धिंगत होऊ लागतात. त्यालाच आम्ही ‘रूपांतरण’ असे संबोधतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 355)

श्रीअरविंद