साधना, योग आणि रूपांतरण – २०२
आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation) हे दोन रूपांतरणांपैकी पहिले आवश्यतक असणारे रूपांतरण असते. तुमच्यामध्ये जर आंतरात्मिक रूपांतर झाले तर ते दुसऱ्या रूपांतरणास अतिशय साहाय्यक ठरते. हे दुसरे रूपांतरण म्हणजे सामान्य मानवी चेतनेचे उच्चतर आध्यात्मिक चेतनेमध्ये होणारे रूपांतरण. आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation) होण्यापूर्वी आंतरात्मिक रूपांतरण झाले नाही तर व्यक्तीचा प्रवास एकतर संथपणे व कंटाळवाणा होतो, अन्यथा तो उत्कंठावर्धक पण जोखमीचा होण्याची शक्यता असते.
*
अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, ब्रह्माचा अगदी साक्षात्कार जरी झाला तरी तो साक्षात्कार सुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 380)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025