साधना, योग आणि रूपांतरण – २०१
व्यक्ती जर नेहमीच उच्चतर चेतनेमध्ये राहू शकली तर, ते अधिक चांगले असते. परंतु मग व्यक्ती नेहमीच तिथे का राहत नाही? कारण निम्नतर चेतना ही अजूनही प्रकृतीचा भाग आहे आणि ती चेतना तुम्हाला स्वतःच्या दिशेने खाली खेचत राहते. पण समजा निम्नतर चेतनाच रूपांतरित झाली तर, ती एक प्रकारे उच्चतर चेतनेचाच भाग बनते आणि मग खाली खेचण्यासाठी निम्न असे काही शिल्लकच राहात नाही.
मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये उच्चतर चेतना किंवा उच्चतर प्रकृती उतरविणे आणि तिने निम्नतर चेतनेची जागा घेणे म्हणजे ‘रूपांतरण’.
खऱ्या आत्म्याची एक उच्चतर चेतना असते, की जी आध्यात्मिक असते; ती ऊर्ध्वस्थित असते. एखाद्या व्यक्तीने जर त्या चेतनेमध्ये आरोहण केले तर, जेवढा काळ ती व्यक्ती तेथे असते तेवढा काळ ती मुक्त असते. परंतु ती व्यक्ती जर पुन्हा मन, प्राण आणि शरीरामध्ये उतरली किंवा त्यांचा उपयोग करू लागली आणि त्या व्यक्तीने जर जीवनाशी संबंध कायम ठेवला – अर्थात तिला तसे करावेच लागते – तर अशावेळी ती व्यक्ती एकतर खाली म्हणजे (मन, प्राण, शरीरामध्ये) उतरून, सामान्य चेतनेमध्ये राहून जीवन जगू लागते किंवा मग असेही घडू शकते की, ती व्यक्ती आत्मस्थित राहूनच मन, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करू लागते. या अवस्थेतील व्यक्तीला मन, प्राण आणि शरीरादी साधनांच्या अपूर्णतांना सामोरे जावे लागते आणि या साधनांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागते. आणि ती सुधारणा फक्त ‘रूपांतरणा’द्वारेच घडविणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 422-423)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…