साधना, योग आणि रूपांतरण – १७३
आपल्याला अंशतः किंवा पूर्णतः चेतनेच्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये घेऊन जाणारी कोणतीही आंतरात्मिक साधना, आंतरिक किंवा परमोच्च ‘सत्या’विषयी कोणताही सहजस्फूर्त किंवा पद्धतशीर असा दृष्टिकोन, ‘ईश्वरा’शी होणाऱ्या ऐक्याची किंवा समीपतेची कोणतीही अवस्था तसेच मानवजातीमध्ये सार्वत्रिक असणाऱ्या स्वाभाविक चेतनेपेक्षा अधिक व्यापक व अधिक सखोल किंवा अधिक उच्चतर अशा चेतनेमध्ये प्रवेश; या साऱ्या गोष्टी आपोआपच ‘योग’ या शब्दाच्या कक्षेमध्ये समाविष्ट होतात.
योग आपल्याला आपल्या पृष्ठवर्ती चेतनेकडून चेतनेच्या गहनतेपर्यंत घेऊन जातो किंवा चेतनेच्या अगदी गाभ्यामध्येच तो आपला प्रवेश करून देतो. आपल्या चेतनायुक्त अस्तित्वाच्या गुप्त असणाऱ्या अत्युच्च उंचीप्रत तो आपल्याला घेऊन जातो. योग आपल्याला ‘आत्म्या’ची रहस्यं आणि ‘ईश्वरा’चे रहस्य दाखवून देतो. तो आपल्याला ज्ञान देतो, दृष्टी देतो, तो आपल्याला अंतर्वासी, विश्वगत आणि विश्वातीत सत्याचे दर्शन घडवितो; आणि तेच त्याचे परम-प्रयोजन असते.
– श्रीअरविंद (CWSA 12 : 329)
- साधना, योग आणि रूपांतरण – २२६ - January 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१९ - January 11, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २१८ - January 10, 2025