साधना, योग आणि रूपांतरण – १७१
योग हे असे एक माध्यम आहे की, ज्याद्वारे व्यक्ती आंतरिक साधनेच्या माध्यमातून, वस्तुमात्रांमागील ‘सत्या’च्या एकत्वापर्यंत येऊन पोहोचते; त्याद्वारे आपल्याला, बहिर्वर्ती आणि वरपांगी चेतनेकडून आंतरिक आणि खऱ्याखुऱ्या चेतनेप्रत नेले जाते. योग-चेतना ही बाह्य, व्यक्त विश्वाचे ज्ञान वर्ज्य करत नाही तर उलट, ती विश्वाकडे अंतर्दृष्टीने पाहते. ती त्याकडे बाह्य दृष्टीने पाहत नाही किंवा त्याचा बाह्यात्कारी अनुभवही घेत नाही; तर ती योग-चेतना आंतरिक, सखोल, महत्तर, सत्यतर चेतनेच्या प्रकाशात बाह्य विश्वाला त्याचे योग्य ते मूल्य प्रदान करते, त्यात बदल घडविते. आणि त्याला ‘सद्वस्तुचा कायदा’ (Law of the reality) लागू करते; प्राणिमात्रांच्या ‘अज्ञाना’च्या कायद्याच्या जागी दिव्य ‘संकल्पा’चा आणि ‘ज्ञाना’चा कायदा प्रस्थापित करते. चेतनेमधील बदल हाच योगप्रक्रियेचा समग्र अर्थ आहे.
*
योग हे एक शास्त्र आहे, ती एक प्रक्रिया आहे; योग हा असा प्रयत्न आणि अशी कृती आहे की ज्यायोगे, मनुष्य त्याच्या सामान्य मानसिक जाणिवेच्या मर्यादा उल्लंघून, महत्तर अशा आध्यात्मिक चेतनेप्रत जाण्याचा प्रयत्न करतो.
– श्रीअरविंद (CWSA 12 : 327)
साधना, योग आणि रूपांतरण – २२६ व्यक्ती (योगसाधना करून देखील) जर स्वतःच्या प्रकृतीमध्ये कोणतेही परिवर्तन…
साधना, योग आणि रूपांतरण – २२५ साधक : फक्त आंतरिक चेतनेमध्ये परिवर्तन झाले तर बाह्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२४ अर्थातच, आत्तापर्यंत, ज्यांनी कोणी हे सचेत रूपांतरण (transformation) साध्य…
साधना, योग आणि रूपांतरण – २२३ (‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला…
साधना, योग आणि रूपांतरण – २२२ आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व…
साधना, योग आणि रूपांतरण – २२१ उत्तरार्ध चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला…