साधना, योग आणि रूपांतरण – १३२
साधना, योग आणि रूपांतरण – १३२
तुम्हाला न आवडणारे काम तुम्ही केलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे चोचले पुरविण्यासारखे आणि त्याचे तुमच्या प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवनव्यवहारांवर आवडी-निवडीचे प्राबल्य असणे हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे लक्षण असते.
कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगाची खरी प्राणिक आणि आंतरात्मिक अवस्था असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 248)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- अभीप्सेमधील गांभीर्य - April 18, 2026
- पूर्णयोगाच्या दृष्टीने ‘प्रामाणिकपणा’चा अर्थ - April 16, 2026
- अदिव्य शक्तींना नकार - April 14, 2026





