अतिमानव : मानव आणि अतिमानसिक जीव यांमधील दुवा
आता हे खात्रीपूर्वक ठामपणे सांगता येईल की, मनोमय जीव आणि अतिमानसिक जीव यांच्यामध्ये एक मधला दुवा असणारी प्रजाती असेल. एक अशा प्रकारचा अतिमानव असेल की ज्याच्यामध्ये मनुष्याचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये काही प्रमाणात असतील; म्हणजे असे की, तो त्याच्या बाह्य रूपाच्या दृष्टीने, त्याच्या पशुसमान जन्मप्रक्रियेनिशी अगदी मानवासारखाच असेल; पण तो त्याची चेतना इतकी रूपांतरित करेल की. साक्षात्कार आणि कृती ह्या दृष्टीने तो जणू त्या नव्या वंशाचा, अतिमानसिक वंशाचा सदस्यच असेल.
अशा ह्या प्रजातीला ‘संक्रमणशील प्रजाती’ असे संबोधता येईल. एखादी व्यक्ती तिच्या भविष्यवेधी दृष्टीद्वारे हे पाहू शकते की, ही संक्रमणशील प्रजाती जन्म देण्याच्या प्राणिजगतातील जुन्या पद्धती ऐवजी, जन्म देण्याची नवीनच मार्ग शोधून काढेल. आणि मग असे खऱ्या अर्थाने आध्यात्मिकरितीने जन्माला आलेले जीव हे त्या नवीन वंशासाठी, अतिमानसिक वंशासाठी आवश्यक असणाऱ्या घटकद्रव्यांचा भाग बनतील.
म्हणजे, प्रजननाच्या जुन्याच पद्धतीने जे जन्माला आले आहेत, परंतु अतिमानसिक साक्षात्काराच्या नवीन जगताशी, जाणीवपूर्वक आणि सक्रिय असा संपर्क प्रस्थापित करण्यात जे यशस्वी झाले आहेत त्यांना आपण ‘अतिमानव’ असे म्हणू शकतो.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 313-314)
- नैराश्यापासून सुटका – ३३ - October 22, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३२ - October 21, 2025
- नैराश्यापासून सुटका – ३१ - October 20, 2025






