ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

व्यावहारिक जीवन

श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी जे तत्वज्ञान मांडले त्याला पूर्णयोग असे म्हणण्यात येते. सर्व जीवन हाच योग आहे असे त्यांचे सांगणे असल्याने, व्यावहारिक जीवन हेही साधनेचेच एक महत्त्वाचे अंग ठरते. अशा व्यावहारिक जीवनातील  समस्या , अडचणी , शंका, प्रश्न या साऱ्यांवर श्रीअरविंद वश्रीमाताजी यंनी वेळोवेळी उत्तरे दिली आहेत, ती येथे वाचावयास मिळतील.