Posts

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

श्रीअरविंदांचे प्रतीक : अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा ही ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोणांच्या संधीस्थानी असलेला मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.

*

ऊर्ध्वगामी त्रिकोणाद्वारे सृष्टीची अभीप्सा दर्शविली जाते; आणि अधोगामी त्रिकोणाद्वारे ईश्वरी प्रतिसाद दर्शविला जातो आणि या दोन्हींच्या संधीस्थानी आविष्करणाचा चौरस तयार होतो.