(दिनांक : १९ जून १९०९)
आमच्या दृष्टीने हिंदुधर्म, सर्वात शंकेखोर आणि सर्वाधिक विश्वासार्ह आहे; तो शंकेखोर आहे असे म्हणण्याचे कारण की त्याने सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याने सर्वाधिक प्रयोग केले आहेत. तो सर्वाधिक विश्वासार्ह आहे असे म्हणण्याचे कारण की, त्याच्याकडे वैविध्यपूर्ण व सकारात्मक आध्यात्मिक ज्ञान आणि सखोल अशी अनुभूती आहे. असा हा विशाल ‘हिंदुधर्म’ म्हणजे केवळ एक मतप्रणाली वा मतप्रणालींचा समुच्चय नव्हे तर तो जीवन जगण्याची प्रणाली आहे. ‘हिंदुधर्म’ ही केवळ सामाजिक चौकट नव्हे तर तो भूतकालीन आणि भावी सामाजिक उत्क्रांतीचा आत्मा आहे. तो कशालाही नकार देत नाही, तर प्रत्येक गोष्टीच्या अनुभवावर व प्रयोग करण्यावर भर देतो; आणि अशा रीतीने एकदा का अनुभवांती व प्रयोगांती ह्या गोष्टींची पारख झाली की तो त्या साऱ्याची आत्मोद्धारासाठी योजना करतो. अशा या ‘हिंदुधर्मा’मध्येच भविष्यकालीन विश्वधर्माचा पाया आम्हास आढळतो. भारताच्या शाश्वत धर्मामध्ये वेद, वेदान्त, गीता, उपनिषदे, दर्शने, पुराणे, तंत्र असे अनेक धर्मग्रंथ येतात; हा धर्म ‘बायबल’ वा ‘कुराण’ यांचाही अव्हेर करीत नाही; पण त्याचा खराखुरा अधिकृत धर्मग्रंथ हा त्याच्या हृदयांत असतो की जेथे ‘ईश्वरा’चा निवास असतो. आमच्या स्वत:च्या आंतरिक आध्यात्मिक अनुभूतीमध्येच आम्ही जगातील ‘धर्मग्रंथां’चा स्रोत आणि त्याचा पुरावा शोधला पाहिजे; तेथेच आम्ही ज्ञानमार्ग, प्रेम व आचार आणि कर्मयोगाची प्रेरणा व पाया या गोष्टी शोधल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
(CWSA 08 : 26)
Posts
Categories
Pages
- ०१ जानेवारी २०१९
- ०१ जानेवारी २०२४
- ०२ फेब्रुवारी २०१९
- ०२ फेब्रुवारी २०२४
- ०३ मार्च २०१९
- ०३ मार्च २०२४
- ०४ एप्रिल २०१९
- ०४ एप्रिल २०२४
- ०५ मे २०१९
- ०६ जून २०१९
- ०७ जुलै २०१९
- ०८ ऑगस्ट २०१९
- ०९ सप्टेंबर २०१९
- १० ऑक्टोबर २०१९
- ११ नोव्हेंबर २०१९
- १२ डिसेंबर २०१९
- HomePage
- अन्य लिंक्स
- अभीप्सा – २०१८
- अभीप्सा – २०१९
- अभीप्सा – २०२०
- अभीप्सा – २०२४
- अभीप्सा मासिकाची भूमिका
- तत्त्वज्ञान
- दर्शन दिन संदेश – 03
- दर्शन दिन संदेश – १९५८
- नवीन ई-बुक्स
- प्रतीक आणि त्याचा अर्थ
- माताजींचा हात सोडू नकोस
- मुख्य-लिंक्स
- व्यावहारिक जीवन
- श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रथम भेटीचा अन्वयार्थ
- श्रीअरविंद यांची ग्रंथसंपदा
- श्रीअरविंद यांचे उत्तरपारा येथील भाषण
- श्रीअरविंदांचा अल्प परिचय
- श्रीमाताजींचा अल्प परिचय
- श्रीमाताजींची ग्रंथसंपदा
- संपर्क
- समाधी दर्शन
- साधना