Entries by श्रीअरविंद

आध्यात्मिक शक्तीची अनुभूती

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…) सघन आध्यात्मिक शक्ती म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? आध्यात्मिक शक्तीला तिचा स्वतःचा असा एक सघनपणा असतो. उदाहरण द्यायचे झाले तर, एखाद्या झऱ्याप्रमाणे ती शक्ती एखादे रूप धारण करू शकते, की ज्याची व्यक्तीला जाणीव होऊ शकते. आणि मग ती व्यक्ती त्या शक्तीस ज्या दिशेला किंवा ज्या कोणत्या वस्तुकडे पाठवायची […]

योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ

  (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) अदृश्य शक्ती इंद्रियसंवेद्य (tangible) असे आंतरिक आणि बाह्य परिणाम घडवून आणतात, हा योग-चेतनेचा संपूर्ण अर्थ आहे. तुम्ही म्हणत आहात की, योगामुळे तुम्हाला त्या शक्तीची नुसती जाणीव होते पण त्यातून कोणतीही फलनिष्पत्ती होत नाही. पण असे म्हणणे हेच खरंतर चमत्कारिक आहे. अशा प्रकारच्या निरर्थक भ्रमाबाबत कोण बरे समाधानी राहू शकेल आणि असे […]

योगशक्तीची विविध रूपे

  ‘योगशक्ती’ आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली असते. या शक्तीस तंत्रशास्त्रामध्ये ‘कुंडलिनी’ शक्ती असे म्हणतात. परंतु ती योगशक्ती आपल्या वरच्या बाजूसदेखील असते, आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस ती ‘ईश्वरी शक्ती’ म्हणून स्थित असते. तेथे मात्र ती वेटोळे घालून बसलेली नसते, अंतर्हित, निद्रिस्त अशी देखील नसते तर ती जागृत, […]

उच्चतर चेतनेची शक्ती

(एका साधकाला त्याच्या मस्तकाच्या वर स्थित असणाऱ्या शक्तीचा अनुभव आला आहे. त्याविषयी श्रीअरविंद मार्गदर्शन करत आहेत…) मस्तकाच्या वर स्थित असणारी शक्ती ही अर्थातच श्रीमाताजींची शक्ती आहे. ती उच्चतर चेतनेची शक्ती आहे आणि ती तिच्या अवतरणासाठीचा मार्ग तयार करत आहे. ही उच्चतर चेतना तिच्यासोबत व्यापकता, अमर्याद अस्तित्व, प्रकाश, शक्ती, शांती, आनंद इत्यादी गोष्टींची जाणीव घेऊन येत […]

मस्तकामध्ये एकाग्रता करणे

  एकाग्रतेचा एक मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक केंद्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन (inner mind) खुले होते; हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते. मात्र मस्तकामध्ये चेतनेचे केंद्रीकरण करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ […]

पूर्णयोगातील दुहेरी प्रक्रिया

  आमच्या पूर्णयोगामध्ये आरोहण आणि अवरोहण अशी दुहेरी प्रक्रिया असते. यामध्ये व्यक्ती चेतनेच्या उच्च व उच्चतर स्तरांवर आरोहण करते आणि त्याच वेळी ती व्यक्ती त्या उच्चतर स्तरांवरील शक्ती मन व प्राणामध्ये उतरवते. एवढेच नव्हे तर, सरतेशेवटी त्या व्यक्तीकडून ती शक्ती अगदी शरीरापर्यंत खाली उतरवली जाते. अतिमानस (supermind) हा या स्तरांमधील सर्वोच्च स्तर आहे आणि (अतिमानस […]

उच्चतर चेतनेचे अवतरण

  (श्रीअरविंद लिखित पत्रामधून…) तुमच्या अंतरंगामधून ज्या कल्पना आणि जाणिवांचा उदय होत असल्याचे तुम्ही लिहिले आहे, ती अतिशय चांगली गोष्ट आहे. त्या कल्पना आणि जाणिवा नवजात आंतरात्मिक स्वरूपाच्या आहेत. विचार नाहीसे होत असल्याची आणि तुमच्या आतमध्ये काहीतरी ऊर्ध्वमुख होत, डोक्यामधून बाहेर पडून, वर जात असल्याची तुम्हाला जी जाणीव होत होती, ती जाणीव आपल्या साधन-प्रक्रियेचा एक […]

चेतनेचे आरोहण आणि अवरोहण

  निम्नतर चेतना ही, उच्चतर चेतनेशी जोडली जाण्यासाठी तिच्या दिशेने आरोहण (ascend) करते आणि उच्चतर चेतना निम्नतर चेतनेचे रूपांतरण करण्यासाठी अवरोहण (descend) करते; हा पूर्णयोगाच्या साधनेतील चेतनेचा एक नियम आहे. – श्रीअरविंद (CWSA 30 : 417)

श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद

  साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का? श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते. – श्रीअरविंद (CWSA 32 : 165)

एकाग्रता कोणत्या केंद्रावर करावी?

  व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र करणे सर्वाधिक सुकर असते किंवा व्यक्तीला ज्या केंद्रावर लक्ष एकाग्र केले असता, सर्वात जास्त परिणाम साध्य होतो त्या केंद्रावर तिने चित्त एकाग्र करण्यास हरकत नाही. ०१) हृदयचक्रावरील एकाग्रता हृदय-चक्रावर एकाग्रता केल्यास ती एकाग्रता-शक्ती ते चक्र (heart-centre) खुले करते आणि चैत्य […]