Entries by auro

प्रामाणिकपणा – ३५

प्रामाणिकपणा – ३५ प्रश्न : माताजी, तुम्ही एकदा मला संपूर्ण प्रामाणिकपणाविषयी काही सांगितले होते. पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय ? श्रीमाताजी : प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी करता येते. यांपैकी कोणतीही गोष्ट पूर्णपणे पारदर्शक असेल तर, त्यामधून कोणताही विपर्यास न होता, प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. चेतना प्रामाणिक असेल तर, दिव्य स्पंदनांमध्ये कोणतीही विकृती न […]

प्रामाणिकपणा – ३४

प्रामाणिकपणा – ३४ प्रारंभ करण्यासाठी तीन गोष्टी अनिवार्य आहेत. ०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा. ०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण. ०३) स्वतःवर धीराने काम करायचे आणि त्याच वेळी, पूर्ण अविचल शांती आणि समता यांचा स्थिर विजय प्राप्त करून घ्यायचा. – श्रीमाताजी [CWM 14 : 41]

प्रामाणिकपणा – ३३

प्रामाणिकपणा – ३३ प्रश्न : श्रीअरविंदांच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रीअरविंदांना मी वैयक्तिकरित्या सर्वोत्तम असे काय अर्पण करू शकेन ? श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा. प्रश्न : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत […]

मन शांत करण्याचा एकमेव उपाय

साधनेची मुळाक्षरे – ३१ तुम्ही मनाला शांत करण्याचा थेट प्रयत्न करत असाल, तर तसे करणे ही अवघड गोष्ट आहे, जवळजवळ अशक्यच असे म्हटले तरी चालेल. कारण मनाचा जो सर्वांत भौतिक भाग असतो तो त्याची क्रिया कधीच थांबवत नाही – एखादे न थांबणारे रेकॉर्डिंग मशीन असावे तसा मनाचा तो भाग चालूच राहतो. त्याने ज्या ज्या गोष्टींची […]

समर्पण आणि आत्मार्पण

समर्पण – ०१ आपल्या जीवनाची सारी जबाबदारी ईश्वराच्या हाती सोपविण्याचा निर्णय म्हणजे समर्पण (Surrender). या निर्णयाव्यतिरिक्त कोणतीच गोष्ट शक्य नाही. जर तुम्ही समर्पण केले नाहीत तर योगाचा प्रश्नच उद्भवत नाही. समर्पणानंतर सारे काही स्वाभाविकपणेच येते कारण योगाची प्रक्रियाच मुळी समर्पणाबरोबर सुरू होते. तुम्ही ज्ञानाच्या माध्यमातून किंवा भक्तीच्या माध्यमातून समर्पित होऊ शकता. केवळ ईश्वरच सत्य आहे […]

,

योगाची पात्रता

प्रश्न : योग करण्याची पात्रता येण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे? श्रीमाताजी : प्रथमतः आपण जागृत झालो पाहिजे. आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या अगदीच अल्प अंशाची जाणीव असते. उरलेला बहतेक सर्व भाग आपल्याला अज्ञात असतो. आपण त्याविषयी अजागृत असतो. या अजागृतीमुळेच आपण आपल्या असंस्कारित प्रकृतीला चिकटून राहतो आणि या अजागृतीमुळेच प्रकृतीमध्ये काही बदल किंवा रूपांतरण घडून आणण्यामध्ये अडसर […]

अतिमानवतेच्या पहिल्या पायऱ्या

उठा, स्वत:च्या अतीत जा, तुम्ही स्वत: जे आहात ते बना. तुम्ही माणूस आहात आणि माणसाची संपूर्ण प्रकृतीच अशी आहे की, त्याने स्वत:पेक्षा अधिकतर व्हावे. एकेकाळी जो मनुष्य-प्राणी होता, आता तो पशु-मानवापेक्षा वरच्या श्रेणीत प्रविष्ट झाला आहे. तो विचारवंत आहे, कारागीर आहे, तो सौंदर्योपासक आहे. पण तो विचारवंतापेक्षाही अधिक असे काही बनू शकतो, तो ज्ञान-द्रष्टा बनावा, […]

अभीप्सा

अभीप्सा म्हणजे जीवाने उच्चतर गोष्टींसाठी केलेला धावा होय; जे काही उच्चतर किंवा ईश्वरी चेतनेशी संबंधित आहे, त्यासाठी किंवा ईश्वरासाठी केलेला धावा होय, त्याला दिलेली हाक आहे. * अभीप्सा ही वासनेचे रूप असता कामा नये तर, ती अंतरात्म्याच्या निकडीची भावना आणि ईश्वराप्रत व ईश्वरप्राप्तीची शांत, स्थिर इच्छा असली पाहिजे, आस असली पाहिजे. * साधकाने योगमार्ग चालणे […]

,

पूर्णयोगाच्या संदर्भात चक्रांचे स्थान

पूर्णयोगामध्ये चक्रांचे संकल्पपूर्वक खुले होणे नसते, तर शक्तीच्या अवतरणामुळे ती आपलीआपण खुली होतात. तांत्रिक साधनेमध्ये ती खालून वर खुली होत जातात, म्हणजे मूलाधार प्रथम खुले होते तर आपल्या पूर्णयोगामध्ये, ती वरून खाली खुली होत जातात, परंतु मूलाधारातून शक्तीचे आरोहण निश्चितपणे होते. पूर्णयोगामध्ये क्वचितच कधीतरी मज्जारज्जूमध्ये प्रवाहाची जाणीव होते, जशी ती इतर नाडीप्रवाहमार्गांमध्ये किंवा शरीराच्या विविध […]