साधना, योग आणि रूपांतरण – ७२

(श्रीमाताजी साधकांना उद्देशून…)
तुमच्या सर्वांच्या अंतरंगात असणारा दरवाजा उघडण्यासाठी मी खूप काळजी घेते. आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये एकाग्रतेची थोडीशी जरी कृती केलीत तर, तुम्हाला न उघडणाऱ्या बंद दरवाजासमोर दीर्घ काळ वाट पाहावी लागणार नाही. तुमच्याकडे त्याची किल्लीही नसते आणि तिचा उपयोग करून तो दरवाजा कसा उघडायचा हेही तुम्हाला माहीत नसते. खरेतर, दरवाजा उघडलेलाच आहे, मात्र तुम्ही केवळ तुमची दृष्टी त्या दिशेने वळवली पाहिजे. तुम्ही त्याकडे पाठ फिरवता कामा नये.

– श्रीमाताजी (CWM 13 : 82)

श्रीमाताजी