साधना, योग आणि रूपांतरण – ११
अंतर्दर्शने ही आध्यात्मिक स्तरावरून होत नाहीत तर ती सूक्ष्म भौतिक, प्राणिक, मानसिक, आंतरात्मिक किंवा ‘मना’च्या वरच्या स्तरांवरून होत असतात.
आध्यात्मिक स्तरांवरून जे अनुभव येतात ते ‘ईश्वरा’चे अनुभव असतात. सर्वत्र आत्माच असल्याचा अनुभव, सर्वांमध्ये ‘ईश्वर’ निवास करत असल्याचा अनुभव इत्यादी अनुभव आध्यात्मिक स्तरावरून येतात.
*
ध्यानामध्ये खोलवर गेल्यावर एखाद्या व्यक्तीला विविध दर्शनं होऊ शकतात; किंवा दुसरी एखादी व्यक्ती सखोल चेतनेमध्ये प्रविष्ट होऊनसुद्धा तिला दर्शनं होत नाहीत; असे असू शकते. साधनेचे परिणाम व्यक्तीच्या प्रकृतीनुसार भिन्न भिन्न असतात.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 87-88)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025