कर्माची श्रेष्ठ-कनिष्ठता?
कर्म आराधना – ४३
आध्यात्मिक सत्याच्या दृष्टीने, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची कल्पना खचितच परकी आहे. आध्यात्मिकदृष्ट्या पाहिले असता, कोणतीच गोष्ट छोटी वा मोठी नसते. साहित्यिक लोकांच्या अशा कल्पना असतात की, काव्य लिहिणे हे श्रेष्ठ दर्जाचे कर्म आहे आणि चपलाबूट तयार करणे, स्वयंपाकपाणी करणे हे हलक्या दर्जाचे, किरकोळ कर्म आहे. परंतु आत्म्याच्या दृष्टीने ही सारी कर्मं समानच असतात – आणि कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती आंतरिक वृत्तीच महत्त्वाची असते.
*
सर्व काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे – एखादे काम करणे, बोलणे, वाचणे, लिहिणे या साऱ्या गोष्टी, सामान्य चेतनेच्या विखुरलेल्या आणि अशांत हालचालींनिशी करता कामा नयेत; तर त्या खऱ्या चेतनेचा एक भाग म्हणूनच केल्या पाहिजेत.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 247, 254]
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- आत्मसाक्षात्कार – ०२ - July 18, 2025
- भारताचे पुनरुत्थान – १६ - July 16, 2025
- भारताचे पुनरुत्थान – १५ - July 15, 2025