कर्म आराधना – २३
कर्मासाठीच केलेले कर्म किंवा कोणतीही मागणी न करता, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक प्रतिफळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सामान्यत: ‘निरपेक्ष कर्मा’चा अर्थ घेतला जातो. परंतु ‘ईश्वरा’साठी, कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केलेले इच्छाविरहित कर्म, असा ‘योगा’मध्ये ‘निरपेक्ष कर्मा’चा अर्थ होतो. असे कर्म, एकतर ‘ईश्वरा’ची तशी इच्छा आहे म्हणून केले जाते किंवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी केले जाते.
*
स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता एवढेच तुमच्या ‘योग’साधनेचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे म्हणूनदेखील तुम्ही योगसाधना केली पाहिजे.
– श्रीअरविंद
[CWSA 29 : 231]
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- प्राणाचे रूपांतरण – प्रास्ताविक - February 14, 2025
- मानसिक प्रशिक्षण - February 13, 2025
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025