कृतज्ञता – ०१
योगमार्गामध्ये कृतज्ञतेद्वारे चेतनेची एक विशिष्ट अवस्था अभिव्यक्त होते, त्यामध्ये समर्पण व विश्वास या भावनेतून ईश्वराभिमुख होणे असते; ईश्वराकडून ज्या कोणत्या आंतरिक व बाह्य भेटवस्तू मिळतात त्यांचा आनंदाने स्वीकार असतो. किंबहुना, कृतज्ञतेच्या या अवस्थेमध्ये व्यक्ती जीवनातील प्रत्येक घटनाच ईश्वरी कृपेची देणगी आहे, आशीर्वाद आहे, या भूमिकेतून स्वीकारते.
कृतज्ञता म्हणजे काय, ती व्यक्तींबाबत बाळगायची की ईश्वराबाबत, त्याचे साधकाच्या जीवनातील स्थान काय, या आणि या सारख्या अनेक गोष्टींबाबत जाणून घेऊयात उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘कृतज्ञता’ या मालिकेद्वारे! वाचक त्याला नेहमीप्रमाणेच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
संपादक,
अभीप्सा मराठी मासिक
Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
- प्रस्तावना - November 17, 2023
- प्रत्येक धर्माचे योगदान - November 6, 2023
- सुखी होण्याचा मार्ग - November 2, 2023