महायोगी श्रीअरविंद – १७
‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंदांचा देह समाधिस्थ करण्यात आल्यानंतर, दि. ०९ डिसेंबर १९५० रोजी श्रीमाताजींनी पुढील संदेश दिला. हा संदेश श्रीअरविंदांच्या समाधीवर संगमवरामध्ये कोरण्यात आला आहे.
“आमच्या प्रभूचे भौतिक आवरण असणाऱ्या हे देहा, तुझ्याप्रत आमची अनंत कृतज्ञता!! ज्याने आमच्यासाठी इतके काही केले, ज्याने कार्य केले, ज्याने संघर्ष केला, ज्याने दुःखभोग सहन केले, ज्याने आशा बाळगली, ज्याने खूप चिकाटी बाळगली; ज्याने सर्वासाठी संकल्प केला, सर्वासाठी प्रयत्न केले, आमच्यासाठी सारे काही तयार करून दिले, ज्याने आमच्यासाठी सारे काही प्राप्त करून घेतले; त्याच्याप्रत आमची अनंत कृतज्ञता! त्याच्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि अशी प्रार्थना करत आहोत की, आम्हाला त्याचे कधीही विस्मरण होऊ नये; अगदी एक क्षणदेखील आम्ही हे विसरू नये की, आम्ही सारे त्याचे ऋणी आहोत.” (क्रमश:)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ०१ - October 30, 2025
- नैराश्यापासून सुटका – ०१ - September 19, 2025
- जीवन जगण्याचे शास्त्र – ०१ - August 14, 2025





