सद्भावना – ०१
पूर्णयोगाच्या आव्हानात्मक मार्गावर पुढे किंवा वर आपण जसजसे प्रगत होत जातो, तसतशा प्रत्येक टप्प्यावर आपल्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. – प्रामाणिकपणा, विनम्रता, समता, अभीप्सा, नकार, समर्पण… अशांपैकीच एक गोष्ट म्हणजे सद्भावना. परंतु ‘सद्भावना’ या शब्दाचा खरा अर्थ काय? आपल्या साधनेमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्याचे नेमके स्थान कोणते? हा असा एक शब्द आहे की, जो गप्पांच्या ओघात अगदी सहजगत्या वापरण्याची आपल्याला सवय असते; खरे तर, तो शब्द अत्यंत अर्थगर्भ आणि कृतीमध्ये परिवर्तन घडविणारा आहे. हा असा एक पायरीचा चिरा आहे की, ज्यावर आपल्या सहवासात आलेल्या लोकांकडे आणि जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अवलंबून असतो.
‘सद्भावना’ या वरकरणी साध्या-सोप्या वाटणाऱ्या शब्दाचा अर्थ आणि त्याचे उपयोजन ज्यामधून स्पष्ट होईल असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचे विपुल साहित्य आहे, त्यातील निवडक भाग येथे मोठ्या सद्भावनेने आपल्या सर्वांसमोर प्रसृत करत आहोत.
– संपादक, ‘अभीप्सा’ मासिक
- प्राणशक्ती – उपयुक्त की विघातक? - February 15, 2025
- रूपांतरणाचे प्रकार – प्रास्ताविक - February 4, 2025
- रूपांतरणाचे प्रकार – प्रास्ताविक - February 2, 2025