विचार शलाका – ०८
दैवगती अटळ आहे असे समजून, भौतिक जीवन ज्याच्या त्याच्या नशिबानुसार आहे तसेच सोडून देण्याची एक पळवाट म्हणजे ‘पूर्णयोग’ नव्हे; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही पूर्णयोग नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे, असे मानून त्याचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.
अगदी सर्वसामान्य मानसिक चेतनेपासून ते अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या जाणिवांच्या सर्व श्रेणी चढत चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण (Ascent) पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येऊन, पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतूने, प्राप्त करून घेतलेली ती अतिमानसिक शक्ती आणि चेतना, या भौतिक विश्वामध्ये भरून टाकणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.
मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत, हे जीवन देऊ शकणार नाही अशा उच्चतर गोष्टींची जे या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच माणसांसाठी ‘पूर्णयोग’ आहे. ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वतःला विचारत राहतात आणि तरीही ज्यांना त्या प्रश्नांची कोणतीही निश्चित अशी उत्तरे सापडत नाहीत, अशी माणसंच ‘पूर्णयोगा’साठी तयार झालेली असतात.
– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २५ - October 2, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २४ - October 1, 2023
- सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन – २३ - September 30, 2023