विचार शलाका – १६

जुन्या योगांच्या तुलनेत हा योग (पूर्णयोग) नवीन आहे : कारण या योगाचे उद्दिष्ट इहलोक-निवृत्ती किंवा स्वर्गातील जीवन किंवा निर्वाण हे नाही. जीवन आणि अस्तित्व यामध्ये परिवर्तन हे त्याचे असलेले उद्दिष्ट, काही गौण किंवा प्रासंगिक नव्हे तर (सुनिश्चित), स्पष्ट आणि केंद्रवर्ती असे उद्दिष्ट आहे. इतर योगमार्गांमध्ये अवरोहण (descent) असलेच तर ती मार्गातील केवळ एक घटना असते किंवा ती आरोहणाचा (ascent) परिणाम असते, खरे महत्त्व आरोहणालाच असते. आरोहण ही या (पूर्ण)योगातील पहिली पायरी असते पण ती अवरोहणाचे साधन असते. आरोहणाच्या द्वारे घडून आलेल्या नवचेतनेचे अवतरण हीच या ‘साधने’ची मोहोर आणि मुद्रा आहे. अगदी तंत्रमार्ग आणि वैष्णवमार्ग यामध्येदेखील जीवनापासून सुटका हे अंतिम उद्दिष्ट असते (अंततः तंत्रमार्ग आणि वैष्णवमार्गाची परिसमाप्तीदेखील जीवनापासून सुटका यामध्ये होते.) पण येथे जीवनाची सार्थकता, परिपूर्णता हे उद्दिष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

श्रीअरविंद