पूर्णयोगाची योगसूत्रे – ०१

मन, प्राण आणि शरीरधारी मनुष्याला पूर्णत्वप्राप्ती करून घ्यावयाची असेल तर कोणताही एकच एक पारंपारिक योग सर्वथा पुरेसा पडणार नाही, हे लक्षात आल्यानंतर महायोगी श्रीअरविंद यांनी पारंपरिक योगाचे सार सूत्ररूपाने ग्रहण करून, त्याच्या आधारावर पूर्णयोगाची मांडणी केली. त्यांच्या समग्र विचारधनामध्ये पूर्णयोगाचे अनेक पैलू उलगडवून दाखविण्यात आलेले आहेत. श्रीअरविंदांनी पूर्णयोगाची तात्त्विक बैठक सिद्ध केली आणि श्रीमाताजींनी प्रत्यक्ष व्यवहारात या योगाचे आचरण कसे करावयाचे त्याचा आदर्श नेमून दिला. त्यामुळे दैनंदिन जीवनात, व्यवहारात पूर्णयोग कसा आचरणात आणावा यासंबंधी तपशीलवार वर्णन श्रीमाताजींच्या वाङ्मयात आढळते.

उद्यापासून सुरु होणाऱ्या ‘पूर्णयोगाची योगसूत्रे’ या मालिकेमध्ये, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या दोघांच्या विचारसंपदेमधील काही मौक्तिके वेचण्याचा प्रयत्न करणार
आहोत.

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)