जाणीव आणि तिची साधने
येथे दोन गोष्टी विचारात घ्यायला हव्या : जाणीव आणि ही जाणीव ज्या माध्यमांमधून व्यक्त होते ती साधने.
त्या साधनांचा विचार करू : मानसिक अस्तित्वामधून ‘विचार’ निर्माण होतात, भावनिक अस्तित्वामधून ‘भावना’ निर्माण होतात, प्राणिक अस्तित्वामधून ‘कार्यकारी शक्ती’ निर्माण होते आणि शारीरिक अस्तित्व ‘प्रत्यक्ष कृती’ करते.
प्रतिभावान माणसाला काहीही दिले तरी, त्यापासून तो काहीतरी सुंदर असे बनवून दाखवेल कारण तो प्रतिभाशाली आहे. पण त्याच प्रतिभावंताला तुम्ही एक परिपूर्ण असे साधन द्या, तो त्यापासून आधीपेक्षाही अधिक सुंदर असे काही करून दाखवेल. एखादा महान पियानोवादक अगदी खराब झालेल्या पियानोमधूनही काहीतरी उत्तम संगीत निर्माण करेल पण त्याला जुळवलेला, उत्तम असा पियानो द्या, तो त्यापासून अधिकच सुंदर असे काही निर्माण करेल. या दोन्ही बाबतीत जाणीव एकसारखीच आहे पण तिच्या अभिव्यक्तीसाठी चांगल्या साधनाची आवश्यकता असते. – अगदी त्याचप्रमाणे मानसिक, प्राणिक, आंतरात्मिक आणि शारीरिक क्षमता असलेल्या देहाची साधन म्हणून आवश्यकता असते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 40)
- प्रामाणिकपणा हेच तुमचे एकमेव संरक्षण - February 17, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – ३० - February 14, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – २९ - February 13, 2026





