दर्शन दिन संदेश

दर्शन दिन
  • २१ फेब्रुवारी – श्रीमाताजींचा जन्मदिवस (इ. स. १८७८)
  • २९ फेब्रुवारी – अतिमानस अवतरण दिन (इ. स. १९५६)
  • २४ एप्रिल – श्रीमाताजी पाँँडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या. (इ. स. १९२०)
  • १५ ऑगस्ट  – श्रीअरविंद यांचा जन्मदिवस (इ. स. १८७२)
  • १७ नोव्हेंबर – श्रीमाताजी महासमाधी दिन  (इ. स. १९७३)
  • २४ नोव्हेंबर – सिद्धी दिन (इ. स. १९२६) – या दिवशी श्रीअरविंद यांच्या शरीरामध्ये श्रीकृष्णाचे (अधिमानसाचे) अवतरण घडून आले.
  • ०५ डिसेंबर – श्रीअरविंद महासमाधी दिन (इ. स. १९५०)
21 Feb 1958
24 Apr 1958
15 Aug 1958

२१ फेब्रुवारी १९५८

नश्वर शरीराचा जन्म साजरा करणे हे काही थोड्या निष्ठावान भावनांना समाधान देणारे असू शकते. शाश्वत चेतनेचे आविष्करण साजरे करणे हे या विश्वाच्या इतिहासात दर क्षणाला करता येणे शक्य आहे. पण एका नूतन विश्वाचे आगमन, अतिमानस विश्वाचे आगमन साजरे करणे हे एक अद्भुत आणि अपवादात्मक भाग्य आहे.

-श्रीमाताजी

(CWM 15 : 98)

२४ एप्रिल १९५८

दिव्यकृपा पृथ्वीवरील मानवांमध्ये मुक्तिदायक क्रियांच्याद्वारे जे कार्य करते त्याचे दोन परस्परपूरक पैलू आहेत. ते दोन्ही पैलू खरेतर तितकेच अनिवार्य आहेत पण त्यांना समान मान्यता मिळालेली नाही. त्यातील एक पैलू म्हणजे सार्वभौम, अक्षर, अविकारी शांती : जी चिंता, ताण आणि दुःखभोग यांपासून मुक्त करते. आणि दुसरा पैलू म्हणजे गतिशील सर्वशक्तिमान प्रगती : जी पाश, बंध, जडत्व यांपासून मुक्त करते. शांतीचे महत्त्व संपूर्ण विश्वाला मान्य आहे आणि ती दैवी म्हणून ओळखली जाते. परंतु, ज्यांची अभीप्सा तीव्र आणि धैयशाली असते केवळ तेच प्रगतीचे महत्त्व ओळखून, तिचे स्वागत करतात.

– श्रीमाताजी

(CWM 15 : 185)

१५ ऑगस्ट १९५८

श्रीमाताजींचा पांढराशुभ्र प्रकाश हा दिव्य चेतनेचा प्रकाश आहे; तुम्ही अधिकाधिक त्या प्रकाशात जीवन जगत आहात आणि तो प्रकाशच तुम्हाला मुक्तिदायी ठरत आहे.

– श्रीअरविंद

(CWSA 32 : 266)